सोशल मीडियावर नेहमीच दुर्घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. रस्ते अपघातांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. प्रसंगावधान न बाळगल्यानं पुन्हा पुन्हा दुर्दैवी प्रकार घडत असतात. अश्याच एका धक्कादायक प्रकारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये निजामपूर रस्त्यावर बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बसने धडक दिल्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले तरुण खाली पडले आणि चाकाखाली सापडले.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्याच्याच अंगावर काटा येईल. टेंभेवाड्याजवळ आज सकाळी हा अपघात झाला आहे. नगर पंचायत हद्दीत कचरा गोळा करणाऱ्या ट्रॅक्टर जात होता. टेंभेवाड्याजवळ पोहोचल्यानंतर निकम शाळेच्या बसने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण, यात बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
तब्बल ११ महिन्यांनंतर कोमातून बाहेर आला तरूण; कोरोनाबद्दल काहीच माहीत नव्हतं, अन् मग....
या प्रकरानंतर ट्रॅक्टरमध्ये चालकाच्या बाजूला बसलेले दोन तरुण खाली पडले आणि त्यातील एका तरुणाच्या अंगावरून ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक गेले त्यानंतर हे दोघे खाली कोसळतात. समोर आलेल्या माहितीनुसार स्थानिकांनी या दोघांनाही दवाखान्यात नेलं. पण दुर्दैवानं उचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाला. या घटनेचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड झाले आहे.
बापरे! १० वर्षांपासून दारू प्यायचा; घास गिळायला त्रास झाल्यानंतर एक्स रे पाहून डॉक्टर चक्रावले
कचरा गोळा करणाऱ्या महेश सकपाल (वय 19) असं या मृत्यू कामगाराचे नाव आहे. तर जयेश जाधव (वय 22) नावाचा कामगार हा जखमी झाला आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांना घटनास्थळी पोहोचून संपूर्ण प्रकाराची माहिती घेत कारवाईला सुरूवात केली आहे. या प्रकरणात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.