CV Viral News: कोणतीही कंपनी कामासाठी चांगल्यात चांगली व्यक्ती निवडण्याचा प्रयत्न करत असते. यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तुमची सीव्ही. कारण याद्वारे इंटरव्ह्यूचा मार्ग ठरतो. पण काही लोक यालाही गंमतीत घेतात. ते कधी जोशात किंवा स्वत: ला स्मार्ट दाखवण्यासाठी चुका करतात. अशा काही चुका ज्या हैराण करणाऱ्या असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील एका हेल्थ केअर कंपनीच्या सीईओला एका व्यक्तीचा सीव्ही मिळाला. ज्यात त्याने असं काही लिहिलं होतं जे वाचून सीईओ हैराण झाला. व्यक्तीने त्याच्या प्रोफेशनल बाबींसोबत त्याच्या जीवनाशी संबंधित अशी बाब लिहिली होती की, सीईओ हैराण झाला.
एक्स म्हणजे आधीच्या ट्विटरवर हेल्थ केअर कंपनीच्या सीईओने सीव्ही शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्यानी लिहिलं की, नुकताच हा सीव्ही मिळाला. सीव्हीमध्ये लोक त्यांच्या करिअरसंबंधी गोष्टी लिहित असतात. जेणेकरून त्यांना पुढे त्याचा फायदा मिळेल. पण या सीव्ही काहीतरी अजब होतं. व्यक्तीने कव्हर लेटरमध्ये पर्सनल हेल्थशी संबंधित माहीत दिली होती. त्याने त्याचा स्पर्म काउंट सीव्हीत मेंशन केला होता. त्याचा स्पर्म काउंट 800 मिलियन असल्याचं त्याने लिहिलं होतं.
30 ऑक्टोबरच्या या पोस्टला आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यूजर्सनी या पोस्टवर अनेक मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, हेही माहीत करून घेतलं पाहिजे की, त्याला कशाप्रकारची नोकरी हवी आहे. दुसऱ्याने लिहिलं की, तो अनेकदा उमेदवारांकडून ब्लड टाइप, प्लेटलेट्स काउंटची माहिती घेतो. तिसऱ्याने कमेंट केली की, त्याची गरज ऑफिसमध्ये पडू शकते, पण या माहितीची काय गरज.