इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात. जर खरंच एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून करायची असेल तर कतीही अडथळे येऊदे. प्रयत्न केल्याने ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हूरहुन्नरी कलाकाराबद्दल सांगणार आहोत. छत्तीसगडचा रहिवासी असलेल्या गोकर्ण पाटील यांच्या संघर्षाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जन्मल्यापासूनच गोकर्ण पाटील यांना आपले दोन्ही हात नव्हते.
गोकर्ण पाटील यांना चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. हात नसल्यामुळे गोकर्ण यांना चित्र काढणं किंवा कोणतंही काम हाताने करणं शक्य नव्हते. तरीही परिस्थितीवर मात देत गोकर्ण पायाने चित्र काढायला शिकले. त्यामुळे त्यांना आपली स्वप्न पूर्ण करता आली. कालांतराने गोकर्ण यांच्या चित्रकलेचे सर्वत्र कौतुक होऊ लागले.
सध्या गोकर्ण यांच्या चित्रकलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आईएएस अधिकारी प्रियांका शुक्ला यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. गोकर्ण पाटील यांची पूर्ण माहिती प्रियंका शुक्ला यांनी ट्विटरवर दिली आहे. इतकंच नाही तर आपल्या यांच्या चित्रांचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये गोकर्ण पाटील चित्र रंगवण्याचा ब्रश आपल्या पायाच्या बोटांनी पकडत काम करत आहेत. विशेष म्हणजे गोकर्ण पाटील हे ऐकू शकतं नाही. पण त्यांनी स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर एक वेगळं नाव लौकिक मिळवले आहे. अनेकांसाठी गोकर्ण पाटील प्रेरणादायी ठरले आहेत. या व्हिडीओला आत्तापर्यंत ३८ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज् मिळाले आहेत. तसंच ४०० पेक्षा जास्त रिट्विट्स आणि २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
खोदकाम करताना मजूराला सापडला खजिना, मडक्यात जे दिसलं ते पाहून लोक झाले अवाक्...
क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा?