फुड डिलिव्हरी देणारी कंपनी झोमॅटो सध्या फॉर्मात आहे. खाद्यपदार्थांचे दर अव्वाच्यासव्वा असले तरी लोक गरज म्हणून तर कधी सोय म्हणून जेवण, नाश्ता मागवत असतात. झोमॅटोला काय या ना त्या कारणाने लोक जेवण मागवतील तेवढे फायद्याचेच आहे. परंतू, एका हार्टब्रेक झालेल्या तरुणीमुळे झोमॅटोला त्रास होत आहे.
आज झोमॅटोनेच या तरुणीचे नाव घेऊन ट्विट केले आहे. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक अंकिता नावाची मुलगी आहे, ती भोपाळची आहे. तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या पत्त्यावर फुड डिलिव्हरी पाठवून दिली. ती पण कॅश ऑन डिलिव्हरी. त्या तिच्या बॉयफ्रेंडने झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला दरवेळी मी हे जेवण मागविलेले नाही, असे सांगत पैसे देण्यास नकार दिला.
यामुळे झोमॅटोने गंमतीशीर अंदाजाने याबाबतचे ट्विट केल आहे. आता हा प्रकार खरा आहे की जाहिरातीची ट्रिक हे त्या अंकिताला आणि झोमॅटोलाच माहिती. जर खरे असेल तर आता तरी अंकिता बॉयफ्रेंडला त्रास द्यायचे थांबवते की परत तेच करते, हे देखील पहायला मिळेल. या बॉयफ्रेंडला अंकिताने तीनवेळा जेवण पाठविले होते, असा दावा झोमॅटोचा आहे.