सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमधून दिसून येतं की, जंगलात अशक्य असं काहीही नाही. जंगलातील काही दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. बिबट्याचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. आता सोशल मीडियावर एका तहानलेल्या चित्त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण तहानलेल्या चित्त्याला काही सेकंदात आपला जीव गमवावा लागला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया युजर संकेत बडोला यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, ६० सेंकदात गेला. शिकारी स्वतःचं शिकार झाला आहे. हा जंगलाचा नियम आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. पापी पित असलेल्या चित्त्याला काही कळायच्या आतच मगरीने खाऊन फस्त केलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १३ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज आणि १ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही जणांनी असं दृश्य पहिल्यांदा बघिल्याचं म्हटलं आहे तर काहींनी हे दृश्य भयानक असल्याचे म्हटले आहे.
पिल्लांसह बिबट्याचा रस्त्यावर संचार कॅमेरात कैद
५१ सेकंदाचा हा व्हिडीओ आयएएस अधिकारी डॉ. एम.व्ही. राव यांनी ट्विटरवर लक्षणीय कॅप्शनसह पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये एका बिबटयाने आपल्या पिल्लांसह जंगलांच्या दरम्यानचा रस्ता ओलांडला. वाहनांमधून, पर्यटकांनी या बिबट्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ती रस्त्यावरुन जात असताना पिल्लू त्यांच्या आईची आज्ञा पाळण्यास तयार नव्हते. त्यानंतर आईच्या मागे पिल्लं चालू लागली.
६६ वर्षीय गृहस्थानं केलं दुसरं लग्न; अन् सावत्र आईसह वडिलांचा फोटो पोस्ट करत लेक म्हणाला.....
सुरूवातीला ही पिल्लं खेळण्यात व्यस्त होती. त्यानंतर आईने या पिल्लांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेलं. या व्हिडीओमध्ये वन अधिकारी सुशांत नंदा यांनाही टॅग करण्यात आलं होतं. मूळ मालकांना त्यांच्या मार्गावर जाऊ द्या," असं कॅप्शन या पोस्टला दिलं होते. या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी पसंती दिली. लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी