स्वत:च्या २ मुलांची हत्या करून तिसऱ्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका निर्दयी आईनं महिनाभरापूर्वी अशी गोष्ट सांगितली जी आजही लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. तिने ऑनलाईन पोस्ट करत मेंटल हेल्थवर बोलली. ३२ वर्षाची लिंडसे क्लैंसीने मागील वर्षी जुलै महिन्यात फेसबुकवर पोस्ट करत मुलांच्या जन्मानंतर आलेल्या चिंतांनी मी ग्रस्त होते असं म्हटलं. पोस्टपार्टम एंग्जायटी या आजाराने मुलांच्या जन्मानंतर महिला खूप तणावात असतात.
हे प्रकरण अमेरिकेतील मैसाचुसेट्सचं आहे. तिने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलंय की, डाइट आणि एक्सरसाइजनं मला आरोप मिळत होता. लिंडसेच्या पतीने इमरजेंसी नंबरवर फोन केला होता. ३ मुलांना बेशुद्ध अवस्थेत त्यांनी पाहिले होते. लिंडसेने २ मुलांना मारलं होते आणि तिसऱ्या गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत: खिडकीतून उडी घेतली.
ती व्यवसायाने डिलीवरी नर्स होती. आता हत्येचे २ खटले आणि एक गळा दाबून मारण्याचा प्रयत्न या आरोपाचा ती सामना करत आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याने आरोपी आई जखमी झाली होती. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याप्रकारच्या घटनांमध्ये उत्तरांऐवजी प्रश्नच खूप असतात असं अटार्नी टिमोथी क्रूज यांनी सांगितले.
रिपोर्टनुसार, लिंडसे खूप काळापासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे. २०१२ मध्ये क्विनिपियाक विश्वविद्यालयाच्या एका जुन्या ईअरबुक पुस्तकात लिंडसेने लिहिलं होते की, जीवनात कधी कधी गडबड होते. त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही कितीही संघर्षांने लढला, तुम्हाला अपयश येते. हे खूप भयानक आहे. ही संधी आहे ज्यात तुम्ही तुमच्या मित्रांना जवळ येण्याची संधी द्यायला हवी.