सोशल मीडियावर एका विचित्र घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हि़डीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही दिवसांपूर्वी चीनमधील हार्बिनमध्ये एक विचित्र घटना घडली. या घटनेने सर्वांना हैराण केलं आहे. एका ब्रिजखाली एक एअरप्लेन अडकलेलं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. न्यू चायना टिव्हीच्या वृत्तानुसार, एका ट्रकवरून क्रॅश झालेलं विमान घेऊन जात असताना घडली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. डॅमेज एअरप्लेनला ट्रकमार्फत ब्रिजच्या खालून घेऊन जात होते. परंतु, विमान ब्रिजखाली अडकलं. खूप प्रयत्न केले पण काही केल्या ट्रक ब्रिजखालून बाहेर निघत नव्हतं. तेवढ्यात एका कर्मचाऱ्याला एक युक्ती सुचली अन् त्यानंतर ब्रिजखाली अडकलेला विमानाचा ट्रक बाहेर काढणं शक्य झालं.
दोन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता. ज्यामुळे 13 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला होता. ट्विटरवर आतापर्यंत हा व्हिडीओ 27 हजार लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ चिनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवरही शेअर केलं जात आहे. लोकांनी या व्हिडीओवर अनेक रिअॅक्शन्स दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ :
न्यू चायना टिव्हीने सांगितल्यानुसार, जेव्हा काहीच उपयोगी पडत नव्हतं तेव्हा ड्रायवरची युक्ती कामी आली. त्याने ट्रकच्या टायरमधील हवा काढून टाकण्यास सांगितली. त्यानंतर अडकलेलं विमान सहज बाहेर काढणं शक्य झालं.
ट्रकचे टायर फार मोठे होते. त्यांतीत हवा काढल्यानंतर ट्रकची उंची कमी झाली आणि त्यावर असलेलं विमानही ब्रिजपासून खाली आलं. त्यानंतर बाहेर काढणं शक्य झालं. ब्रिजखालून ट्रक बाहेर निघाल्यानंतर पुन्हा ट्रकच्या टायरमध्ये हवा भरण्यात आली आणि विमान योग्य ठिकाणी पोहोचवणं शक्य झालं.