आापातकालीन स्थितीत आपले प्राण पणाला लावून सैनिक सर्वसामान्य लोकांचा जीव वाचवतात. हे तुम्हाला माहितच असेल. आता एका सैनिकाच्या पायांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार हा फोटो एका चीनी सैनिकाचा आहे. चीनमध्ये ८ जुलैला भुस्सखलन झालं. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील सैनिकांचे बचावकार्य सुरू होते. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत त्यांना काम करावे लागले. जवळपास ३० तासांपर्यंत सैनिकांचे कार्य सुरू होते. त्यानंतर एका सैनिकांने आपल्या पायांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोशल मीडियावर लोकांनी हा फोटो पाहून सैनिकाला सलाम केलं आहे. आतापर्यंत या फोटोतील सैनिकाचे नाव आणि पत्ता याबाबत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. या रेस्क्यू ऑपरेशनसाठी ६० लोकांच्या टीमला रावाना करण्यात आलं होतं. त्यापैकी एका सैनिकाच्या पायाची अशी अवस्था झाली आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या भुस्सखलनात ९ लोक ढीगाऱ्याखाली दाबले गेले होते. तर ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण दिवसभर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या माहामारीत रात्रंदिवस झटत असलेल्या डॉक्टारांच्या हाताांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. १० तासांची ड्यूटी संपवून पीपीई किट काढल्यानंतर कोरोना योद्ध्यांच्या हाताची अवस्था कशी होते. ते यात पाहता आलं. या फोटोत संपूर्ण हातांना सुज आली होती. आईएएस अधिकारी अवनीश शरण यांनी १० तासांची शिफ्ट केलेल्या डॉक्टरांच्या हाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
हा फोटो शेअर करताना अववीश शरण यांना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, १० तास सतत पीपीई किट घालून काम केल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा हातातील ग्लोव्हज काढले तेव्हा हातांची अवस्था अशी झाली होती. हा फोटो पाहून कोरोनाला हरवण्यासाठी झुंज देत असलेल्या आरोग्यसेवेतील कर्मचारी वर्गाची काय स्थिती असेल हे तुमच्या लक्षात येईल.
त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास
कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण