चीनमधले (China) नागरिक आपल्या चित्रविचित्र आहारासाठी ओळखले जातात. जगातला कुठलाही कीटक, प्राणी ते लोक आरामात खाऊ शकतात, असं म्हटलं जातं. त्यांच्या या सवयींमुळेच दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोना पसरला, असा आरोपही केला जातो. चीनने मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे. लस तयार करण्यात यश आल्याने गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. जगभरातल्या नागरिकांसह आरोग्य यंत्रणांना थोडासा दिलासा मिळाला आहे. अशातच सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी घराच्या छतावर लाल विंचवांची शेती (Scorpion Farming) करत असल्याचं दिसत आहे. या चिनी मुलीमुळे पुन्हा कोरोना पसरेल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये काळे कपडे घातलेली चायनीज मुलगी दिसत आहे. तिने आपल्या पायामध्ये काळे रबरी बूट घातलेले असून, हातामध्ये मात्र सुरक्षेसाठी काहीही घातलेलं नाही. ग्लोव्ह्ज न घातलेल्या हातांनी ती अगदी सहज विंचवांनी भरलेलं बास्केट गच्चीवर रिकामं करताना दिसत आहे. ज्याप्रमाणे आपण गच्चीवर वाळत घातलेल्या मिरच्या खाली-वर करतो, अगदी तशाच पद्धतीनं ती मुलगी विंचू हाताने खाली-वर करत आहे. तिची ही करामत पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. एक युजर म्हणाला, 'ही मुलगी आता हे विंचू फ्राय करून खाईल.' काहींनी चीनच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे. चीनने आपल्या भूतकाळातल्या चुकांमधून काही तरी धडा घ्यावा, असं युजर्सचं म्हणणं आहे. चिनी लोक अशाच प्रकारे विंचू आणि वटवाघळं खात राहिले, तर पुन्हा कोरोना पसरेल, अशाही कमेंट्स काहींनी केल्या आहेत.
इन्स्टाग्रामवरच्या नेचरलव्हर्स_ओके (naturelovers_ok) नावाच्या अकाउंटवरून हा विंचवांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ चीनमधला आहे की नाही, याची अद्याप खात्री झालेली नाही, मात्र व्हिडीओमधली चायनीज दिसणारी मुलगी (Chinese girl) ज्या सहजपणे विंचू हाताळत आहे, त्यावरून लोक तिला चायनीजच समजत आहेत. त्यामुळे युजर्स त्या मुलीवर प्रचंड टीका करत आहेत.