(Image Credit : YouTube)
एका १० वर्षीय मुलाला त्याच्या आईसाठी हिऱ्याची अंगठी खरेदी करायची होती. त्याने कसेतरी पैसे जोडले. ही रक्कम ८, ८०० युआन(९४ हजार रूपये) होती. मग काय तो त्याच्या आईला एका ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन गेला. इथे त्याने त्याच्या बजेटनुसार आईसाठी एक अंगठी निवडली. पण त्यानंतर त्याच्या आईने जे केलं ते पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
सेंट्रल चीनच्या Hubei प्रांतातील ही घटना आहे. येथील १० वर्षीय मुलाने त्याच्या आईला एक सुंदर गिफ्ट देण्यासाठी मोठी रक्कम जमा केली. ही रक्कम त्याने चायनीज न्यू इअर दरम्यान मोठ्यांकडून मिळालेल्या खाऊमधून जमा केली होती.
रिपोर्टनुसार, आपल्या मित्रांच्या आईच्या हातात त्याने हिऱ्याची अंगठी पाहिल्यावर त्यालाही आईसाठी अंगठी घेण्याच विचार आला. जेव्हा त्याने त्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईला ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन गेला, तेव्हा त्याच्या आईला गंमत वाटली. पण नंतर ती स्टोरमधून जाऊ लागली. मग काय मुलगा रडायला लागला.
आपल्या मुलाला रडताना पाहून तिने त्याला गप्प केलं आणि मिठी मारली. त्यानंतर आईसाठी त्याने त्याच्याकडे असलेल्या रक्कमेच्या किंमतीची अंगठी निवडली. पण मुलाने हे पैसे असे खर्च करू नये असं त्याच्या आईला वाटत होतं. त्यामुळे त्याच्या आईने एक आयडिया केली आणि ५० हजार युआनचीची एक अंगठी निवडली. आता इतके पैसे आपल्याजवळ नसल्याने मुलगा नाराज झाला. त्यावर आई म्हणाली की, 'असं कर आणखी काही पैसे जमा कर आणि त्यानंतर माझ्यासाठी ही अंगठी खरेदी कर'.