Bathroom Bucket Cleaning Tips : सामान्यपणे जास्तीत जास्त घरांमधील बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बकेट, मग, टब आणि स्टूलचा वापर केला जातो. मात्र, प्लास्टिकच्या या वस्तू काही दिवसांमध्येच खराब होतात. यांवर पिवळे काळे चिकट डाग लागतात. अशात कुणी पाहुणे घरी आले आणि त्यांना ते दिसले तर बरोबर वाटत नाही. अनेकांना हे डाग दूर करण्याचे उपाय माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या बाथरूममधील या वस्तू चकाचक दिसतील.
जर बाथरूममधील बकेट, मग किंवा स्टूलवर हे वेगवेगळे डाग किंवा चिकटपणा असाच राहिला तर यावर अनेक घातक बॅक्टेरियाही चिकटून राहतात. जे घरातील सगळ्यांसाठीच घातक ठरू शकतं. अशात या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी काय उपाय करावे हे आज जाणून घेऊया...
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
प्लास्टिकची बकेट आणि मगवरील चिकट पिवळे, काळे डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिक्स करून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट बकेट आणि मगावरील डागांवर लावून काही वेळ ठेवा. त्यानंतर पाण्याते ते स्वच्छ करा.
लिंबाने दूर होतील डाग
लिंबामध्ये अॅसिटिक अॅसिड असतं, ज्यामुळे पाण्याचे डाग सहजपणे दूर होण्यास मदत मिळते. अशात बाथरूम बकेट किंवा प्लास्टिकच्या वस्तू चमकवण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. लिंबाचा रस या वस्तूंवर ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर पाण्याने आणि ब्रशने डाग दूर करा.
ब्लीचचा करा वापर
बाथरूमधील बकेट आणि मगाचे डाग काढण्यासाठी तुम्ही ब्लीचचा वापरही करू शकता. ब्लीच पाण्यात भिजवून या वस्तूंवर काही वेळांसाठी लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने या वस्तू धुवून घ्या.
हायड्रोजन पॅरोक्साइड
हायड्रोजन पॅरोक्साइड एक चांगला पर्याय आहे. ज्याने डाग आणि चिकटपणा दूर होण्यास मदत मिळते. एका स्प्रे बॉटलमध्ये हायड्रोजन पॅरोक्साइड आणि पानी समान प्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण डाग असलेल्या वस्तूंवर स्प्रे करा. १० ते १५ मिनिटे ते तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवून घ्या.
भांडी घासण्याचं पावडर
भांडी घासण्याचं पावडरही प्लास्टिकवरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. एका भांड्यात भांडी घासण्याचं पावडर घ्या आणि त्यात पाणी मिक्स करा. ही पेस्ट डाग असलेल्या जागांवर लावा आणि १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. नंतर एका ब्रशच्या मदतीने डाग घासून घ्या.