तसा तर आपण सूर्य रोजच बघतो. पण तो आपल्यापासून इतका दूर आहे की, आपण त्याला स्पष्टपणे बघू शकत नाही. तसं तर एकसारखं सूर्याकडे बघताही येत नाही. सूर्यावर इतकी उष्णता आहे की, चंद्रासारखं तिथे एखादं मिशनही शक्य नाही. असं असलं तरी आज आम्ही तुम्हाला सूर्याचा सर्वात स्पष्ट आणि जवळचा फोटो दाखवणार आहोत.
सूर्याचा हा फोटो पाहून तुम्हाला वाटेल की, आता तुम्ही सूर्याला स्पर्श करू शकाल. हा फोटो Jason Guenzel नावाच्या एका फोटोग्राफनरने त्याच्या thevastreaches या इन्स्टाग्राम अकाऊंटववर शेअर केला आहे. त्याने या फोटोला सूर्यावरील एक विकसनशील सक्रिय क्षेत्र १२९०७ असं नाव दिलं आहे.
Jason एक अमेरिकन फोटोग्राफर आहे. तो मिशिगनचा राहणारा आहे. ही पहिली वेळ नाही की, Jason ने सूर्याचा असा फोटो क्लीक केला. याआधी जानेवारीमध्ये त्याने एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोला त्याने मॅग्नेटिक सन नाव दिलं होतं. पण लोकांनी असं पसरवलं होतं की, तो फोटो नासाने रिलीज केलाय.
पण खरं तर हे होतं की, तो फोटो Jason चा होता. तो फोटो डिजिटली एटीड केला होता. तो म्हणाला होता की, हा सोलर क्रोमोस्फीअरचं सॉफ्टवेअरने एडीट केलेला फोटो आहे. ही एकप्रकारे विज्ञान आणि कलेमधील एक बारीक लाईन आहे. ज्यावर चालण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाचा फोटो एक सोलर टेलीस्कोपला कनेक्ट असलेल्या कॅमेराच्या माध्यमातून घेण्यात आला होता. नंतर त्याला क्रिएटीव्हली एडीट केलं गेलं. अशात जो फोटो त्याने आता शेअर केलाय, तोही प्रोसेस केलेलाच वाटतोय.