Patna Railway Station : आपल्याकडे रेल्वेस्टेशनवर एलईडी स्क्रीन लावलेल्या असतात. या स्क्रीनवर रेल्वेगाड्यांचे टाईमटेबल लावण्यात आलेले असते, तसेच सूचनाही दाखवल्या जातात. पण, बिहरमधील पटना रेल्वेस्थानकावर अचानक एका एलईडी स्क्रिनवर पॉर्न व्हिडीओ सुरू झाला. सर्व प्रवाशांचे लक्ष या स्क्रिनवर गेले. तब्बल ३ मिनिट स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ सुरूच होता. शेवटी प्रवाशांनी या प्रकरणाची रेल्वेकडे तक्रार केली.
तक्रारीनंतर हा पॉर्न व्हिडिओ बंद झाला. या लाजिरवाण्या घटनेबाबत जाहिरात एजन्सीवर आरपीएफ पोस्टमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या घटनेवर रेल्वेनेही कडक कारवाई केली आहे. डीआरएम प्रभात कुमार यांनी पटना जंक्शन येथे अश्लील व्हिडीओ चालवणाऱ्या जाहिरात एजन्सीवर दंड ठोठावला आहे आणि एजन्सीचा करार रद्द करून काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही जारी केले आहेत.
पाटन रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व प्लॅटफॉर्मवर एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. यापैकी एका स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ सुरू झाला. हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून याआधीही पाटण्यात एलईडी स्क्रीनवर असा घाणेरडा व्हिडीओ झळकला होता, मात्र त्यादरम्यान अधिकाऱ्यांना नंतर माहिती मिळाली. यावेळी ही बाब तात्काळ निदर्शनास येताच अधिकाऱ्यांनी कडक कारवाई केली.
२०१७ मध्ये दिल्ली मेट्रोच्या राजीव चौक स्टेशनवर अचानक एक अश्लील व्हिडीओ सुरू झाला होता.हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मेट्रो प्राधिकरणाला ट्रोल केले होते.