भुवनेश्वर : ओडिशा सरकार (Odisha Government) राज्यातील नवविवाहित जोडप्यांसाठी एक अनोखी योजना सुरू करत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार कुटुंब नियोजन किट भेट म्हणून देणार आहे. या किटमध्ये कंडोमशिवाय कुटुंब नियोजनासंबंधित असलेल्या इतर काही वस्तूंचा समावेश असणार आहे.
राज्यसरकार देणार कंडोम किटदरम्यान, राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या माध्यमातून सुरू होणारी ही पहिलीच योजना आहे, जिचा उद्देश नवदाम्पत्यांना कुटुंब नियोजनाची माहिती करूण देणे हा आहे. कुटुंब नियोजनाच्या कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या पद्धतींबद्दल लोकांना शिक्षित करणे आणि त्यांचा अवलंब करण्यासाठी जागरूकता वाढवणे हा यामागील प्रमुख हेतू आहे.
ओडिशा राज्य सरकारने नवविवाहित जोडप्यांना भेट म्हणून वेडिंग किट देण्याची एक अनोखी योजना राबवली आहे. या किटच्या माध्यमातून सरकारकडून कुटुंब नियोजनाची माहिती, त्याचा लाभ, लग्नाचे नोंदणी प्रमाणपत्र, कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचे एक पुस्तक दिले जाईल. याशिवाय गिफ्ट किटमध्ये गर्भधारणा चाचणी किट, टॉवेल, कंगवा, नेल कटर, आरसा अशा काही जीवनावश्यक वस्तूंचा देखील समावेश असणार आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण मोहिमकुटुंब नियोजन पद्धतीचे संचालक डॉ. बिजय पाणिग्रही यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, मान्यताप्राप्त असलेले सामाजिक आरोग्य कर्मचारी नवविवाहित जोडप्यांना किटचे वाटप करतील. तसेच या किटच्या वाटपाला सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या कार्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे, जेणेकरून ते लोकांना हे अंगीकारण्यासाठी योग्यरित्या जागरूक करू शकतील. सरकारकडून या किटची संपूर्ण माहिती संबंधित लोकांपर्यंत पोहचवली जाईल असे पाणिग्रही यांनी अधिक म्हटले.