कोरोना व्हायरसच्या प्रसारात समाजासाठी मदतीचा हात देणारे, माणुसकी दाखवत संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करणारे लोक खूप कमी दिसून येत आहेत. दुसरीकडे माणूसकीला काळीमा फासत असलेल्या घटनांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. मात्र, सध्या औषधं आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोनाबाबत ( Corona Positive) अधिक भीती निर्माण झाली आहे.
मागच्या वर्षीप्रमाणेच आताही कोरोनाच्या प्रसाराबाबात लोकांच्या मनात धडकी भरली आहे. काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात कामाला असलेल्या एका नर्ससह शेजाऱ्यांनी गैरवर्तन केल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशीच धक्कादायक घटना आता व्हायरल झाली आहे.
आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी
आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला घरात क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र हा माणूस पॉझिटिव्ह असतानाही घराबाहेर पडल्यानंतर तेथील शेजाऱ्यांनी कोरोना पॉझिटिव्ह ( Corona Positive) जोडप्याला त्याच्या घरात कैद केले. स्थानिकांनी केलेल्या आरोपानुसार ,कोरोनाबाधिताच्या कुटुंबाने नियम तोडल्यानं त्यांना हे पाऊल उचलावे लागले.
‘द सन’च्या रिपोर्टनुसार ही घटना आंध्र प्रदेशातील नेल्लोरची आहे. येथील एमआरएम रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहणारे एक जोडपे कोरोना पॉझिटिव्ह आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाबाधित असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. असे असताना पीडितेच्या कुटुंबीयांनी कोविडचे नियम तोडून घराबाहेर पडले म्हणून त्यांना कैद करून ठेवण्यात आलं.
समोर आलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती घरी येत असताना सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाने त्याला पाहिले. यानंतर त्यांनी तातडीने सोसायटीच्या इतर लोकांना माहिती दिली. संतप्त शेजार्यांनी पीडितेच्या लोखंडी दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि काही लोकांना तिथे पहारा देण्यासाठी बसवले. अशा प्रकारे कोरोना-संक्रमित व्यक्तीच्या घराबाहेर जाणे प्रत्येकासाठी धोकादायक ठरु शकते, असं यावेळी आपली बाजू मांडताना सदस्यांनी सांगितले.