छिंदवाडा: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या पाच दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील रुग्णालयांची क्षमता संपली असल्यानं आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी रुग्णालयातील परिस्थिती विदारक आहे. रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा रुग्णालयातही असाच एक प्रकार घडला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णानं त्याची समस्या व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आहे. या व्हिडीओत तरुण रुग्ण वॉर्डमध्ये असलेल्या एका पंख्याची तक्रार करताना दिसत आहे. कोरोना से डर नहीं लगता साहब, फॅन से लगता है, अशी दबंग स्टाईल तक्रार या तरुणानं व्हिडीओमध्ये केली आहे. या तरुणाच्या डोक्यावर असलेला पंखा एखाद्या भोवऱ्यासारखा फिरताना दिसत आहे. हा पंखा लवकरात लवकर बदलण्यात यावा, अशी मागणी या रुग्णानं केली आहे.
कोरोना से डर नहीं लगता साहब, पंखे से लगता है! रुग्णाचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 8:59 AM