सध्या जगभरासह भारतात सुद्धा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचे जीव जायला सुरूवात झाली आहे. अशात कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर येत असलेले लोक चर्चेचा विषय ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसच्या जाळ्यातून सुखरूप सुटका झालेल्या एका महिलेचा व्हिडीओ दाखवणार आहोत.
सर्दी, ताप, खोकला कोरोना व्हायरसची इतकीच लक्षणं नाहीत. कोरोनाव्हायरस झाल्यानंतर नेमकं काय होतं, हा अनुभव एका कोरोनाग्रस्त ट्विटर युजरने (Twitter User) सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. २२ वर्षीय बिजोंडा हलीतीला (Bjonda Haliti) कोरोना व्हायरस आहे.
कोरोना व्हायरसबाबत लोकांना माहिती व्हावी आणि त्याबाबत लोकांच्या मनातील गैरसमज राहू नयेत, यासाठी तिनं ट्विटवर आपला अनुभव केला शेअरआहे आणि लोकांच्या मनातील भीतीही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातील बजोंडाला कोरडा खोकला होता, घशात थोडीशी खवखव वाटत होती. शिवाय थकवाही होता. नंतर डोकं जड झालं, सोबतच थंडी आणि तापही होता. सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे डोळ्यांमध्ये वेदना आणि तोंडात कडवट चव होती.
तिसरा संपूर्ण दिवस बजोंडाने झोपून काढला कारण तिची शारीरिक शक्ती कमी झाली होती आणि ताप खूप वाढला होचा. सोबतच कोरडा खोकला, तीव्र डोकेदुखी, थंडी लागण आणि भीतीही वाटत होती. नंतर बजोंडा डॉक्टरकडे गेली. त्यावेळी तिला फ्लू किंवा स्ट्रेप असं काही नसल्याचं सांगितलं आणि अँटिबायोटिक्स घेण्याचा सल्ला दिला.
चार दिवसांनी बजोंडाचा ताप पूर्णपणे गेला, मात्र इतर लक्षणं दिसून आली. श्वास घेण्यात समस्या जाणवू लागली. बजोंडा म्हणाली, "मला माझ्या छातीवर एक मोठा दगड ठेवल्यासारखं वाटत होतं.शेवटी कोरोनाव्हायरस टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतला बंदिस्तही करून घेतलं आणि रिपोर्टची प्रतीक्षा केली आणि कोरोनाव्हायरस असल्याचं समजलं. ( हे पण वाचा- Corona virus : उन्हात बसून कोरोनापासून लांब राहता येतं? जाणून घ्या एक्सपर्ट्सचं मत)
शिवाय एका विशिष्ट गटाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे, असं सांगितलं जातं. मात्र 22 वर्षांच्या बीजोंडाने आपल्याला दुसरा कोणताही आजार नाही, तसंच आपण धूम्रपान करत नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं. बीजोंडावर उपचार सुरू असून, तिची तब्येत बरी होत आहे. सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन बोजांडाने केलं आहे. ( हे पण वाचा-Coronavirus : कोरोनामुळे बळावला हात धुण्याचा आजार, मानसिक रुग्णांच्या चिंतेत वाढ)