सध्याच्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. भारतातील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. भारतात कोरोना व्हायसरमुळे लोकांचे जीव जायला सुद्धा सुरूवात झाली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सध्या एक शॉर्ट फिल्म सोशल मीडियावर व्हायरल आहे.
हि हॉरर शॉर्ट फिल्म सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका महिलेला भयानक अशा व्हायरसचे संक्रमण होताना दिसून येत आहे. फक्त ५ मिनिटांची ही शॉर्ट फिल्म पाहून तुमची सुद्धा झोप उडेल. ट्रायपोफोबिया (Trypophobia)' नावाची ही शॉर्ट फिल्म २ वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आली होती. पण सध्या कोरोना व्हायरसच्या संक्रमाणामुळे ही शॉर्ट फिल्म जास्तीत जास्त लोक पाहत आहेत.
या फिल्ममध्ये असं दाखवण्यात आलं आहे की एक महिला पब्लिक टॉयलेटमध्ये जाते.त्या दरम्यान तिचा मोबाईल वॉशरूममधील डस्टबीनमध्ये पडतो. तेव्हा आपला मोबाईल शोधण्यासाठी ही महिला डस्टबिनमध्ये हात घालते. तेव्हा एक सुईच्या हाताला टोचते. ही महिला आपल्या हातातून काढून ही सुई फेकून देते. त्याचवेळी तिला घातक अशा व्हायरसचं इन्फेक्शन होतं.