चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले. भारतात काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात सुद्धा अनेक मोठ्या शहरात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. हळूहळू कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
विविध माध्यमातून स्वच्छतेचे आणि स्वतःला कोरोनापासून कसं वाचवता येईल याबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती केली जात आहे. अशात भारतात कोरोनाविषयक जनजागृती निर्मीती करण्यासाठी अनेक गाणी तयार केली जात आहेत. असंच एक गाणं तुम्ही या व्हिडीओच्या माध्यामातून पाहू शकता. बाहेरून आला नी धिंगाणा केला, लोकांना म्हणतो मरोना.... अशी या गाण्याची सुरूवात आहे.
जास्त गर्दीत जाऊ नका,
अन्न बाहेरचं खाऊ नका,
हात हातात घेऊ नका,
जीवन देईल धोका,
नाहीतर मरशील रे तरुणा, तरूणा, तरूणा.... अशा शब्दातूून संदेश दिला आहे.
या गाण्याचे गायक रवी वाघमारे आहेत. हे गाणं सोशल मीडियावर पोस्ट करून याद्वारे लोकांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण सध्याच्या परिस्थिती अनेक लोक कोरोनाला घाबरत आहेत. म्हणून हे गाणं तयार करण्यात आलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले आहे. कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याबद्दल सांगितले आहे. या आधी सुद्धा, कोरोना व्हायरस आलायं चायना मधूनं... धुमाकुळ घातलाय....असं गाणं सुद्धा व्हायरल झालं होतं.