सध्या भारतासह जगभरातही लसीकरणाची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. लसीकरणाासाठी सगळ्यात आधी जेष्ठांना प्राधान्य देण्यात आलं होतं. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीवर्गानंतर वयस्कर लोकांचे लसीकरण सुरू झाले. लसीकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका वयोवृद्ध महिलेला लस टोचली जात आहे. पण इंजेक्शन पाहून तिच्या अंगावर काटे आले आहेत. यावेळी तिने इंजेक्शन पाहून दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्याबाबत अनेक मीम्सही बनवण्यात आले आहेत.
हा व्हिडीओ (instantbollywood) नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहु शकता, एका वयोवृद्ध महिलेला इंजेक्शन दिलं जात आहे. यावेळी संबंधित वयोवृद्ध महिलेनं विचित्र रिअॅक्शन देत भयंकर किंचाळली आहे.
काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS म्हणाले....
इंजेक्शन देताना तिला दोन जणांनी घट्ट पकडलं आहे, तर तिसरी एक महिला तिला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत आहे. इंजेक्शन घेताना वयोवृद्ध महिलेनं दिलेले हावभाव आणि रिअॅक्शन सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. या आजींचे हावभाव पाहणारेही चांगलेच घाबरले आहेत.
कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...
आतापर्यंत या व्हिडीओला 27 लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं असून अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.एका सोशल मीडिया युजरनं लिहिलं आहे की, संबंधित आजी दिल्लीच्या आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओला निरागस व्हिडीओ असं म्हटलं आहे.