सध्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण जगभरातसह भारतात सुद्धा कोरोना व्हायरसची लागण होत असलेल्या आणि कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून लोक कोरोनाचं नाव ऐकून सुद्धा प्रचंड घाबरत आहे. अशात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील मुलगी कोरोना पॉजिटिव्ह आहे. लोकांमध्ये मी कोरोना पसरवेन असं धमकावत आहे.
हा व्हिडीओ अमेरिकेच्या टेक्सासमधील कॅरोल्टन शहरात राहणाऱ्या तरुणीचा आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी ट्वीट करून या प्रकाराची माहिती दिली आहे. संबंधित मुलीची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, पण अत्तापर्यंत तिला अटक करण्यात आलेली नाही.
या व्हिडिओमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव केल्याचा दावा करणार्या मुलीचे नाव लॉरेन मराडियागा आहे. लॉरेनवर दहशत पसरविण्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर लॉरेनची चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळं सोशल मीडियावर मस्करी करणं आता लॉरेनच्या चांगलंच अंगाशी येऊ शकते. याआधी पोलिसांनी लोकांच्या मदतीने या मुलाचा शोध घेतला. ही मुलगी १८ वर्षांची असून, तिच्या व्हिडीओबाबत तिच्या कुटुंबियांना माहिती नसल्याचे पोलिस तपासात समोर आले.