कोरोना व्हायरसपासून बचावासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनापासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव करता यावा यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशा स्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता राबत आहेत. पण काही लोकांनी अजूनही या स्थितीला गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही. अशा लोकांना सुरूवातीपासूनच पोलीस आवाहन करत आहेत. अशात एका पोलीसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम झाला नाही. तर, तुम्हाला वाचवणे अवघड आहे. असं भावनिक आवाहन केलं आहे.
खासदार संजय सिंह यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये एक पोलिस लॉकडाऊनमध्ये गाणं गाऊन लोकांना समजावून सांगत आहे. यावेळी ते, तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर होने न देंगे तुमको कोरोना, असे म्हणत आहेत. या ट्विटच्या माध्यमातून संजय यांनी पोलीसाचं म्हणणं ऐकून लोकांना घरी बसण्याचं आवाहन केलं आहे.