खालील ट्विटनुसार फोटोत जी व्यक्ती दिसत आहे त्या व्यक्तीने कोरोना व्हायरस चॅलेन्ज च्या नावावर पब्लिक टॉयलेट सीट चाटली होती. असं करतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरलही झाला होता. त्यावर जोरदार टिकाही करण्यात आली होती. आता असा दावा करण्यात येत आहे की, या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इतकेच नाही तर या व्यक्तीचं ट्विटर अकाऊंट डिलीट करण्यात आलं आहे.
Prades Seleh नावाच्या यूजरने ट्विरवर लिहिले की, 'ज्याने कोरोना व्हायरस चॅलेन्ज म्हणत टॉयलेट सीट चाटली होती. त्याला आता कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तो हॉस्पिटलमध्ये आहे'. त्यांनी या टॉयलेट सीट चाटणाऱ्या व्यक्तीचे दोन फोटोही शेअर केले आहेत. ज्यातील एकात तो टॉयलेट सीट चाटतोय तर दुसऱ्यात तो हॉस्पिटलमध्ये आहे.
Ava नावाच्या एक तरूणीने 15 मार्चला ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ती सुद्धा टॉयलेट सीट चाटताना दिसली होती. कोरोनाची लागण जगभरात वाढत असताना यांनी केलेल्या मुर्खपणावर लोकांनी संपात व्यक्त केला होता.