सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आहे. अशा परिस्थीतीत जगातल्या अनेक देशात लॉकडाऊन केलं आहे. भारतात सुद्धा कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा तसंच लोकांना सुरक्षित राहता यावं यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या परिस्थीतील काही प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अशाच एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मुलगी घराच्या बाहेर आली आहे. त्याचवेळी आजुबाजुच्या घरांमधून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात होते. एका सुरात शेजारच्या घरातले लोक तिला शुभेच्छा देतात. यावेळी शुभेच्छांमुळे भारावलेली ही लहान मुलगी रडायला लागते. . हा व्हिडीयो ब्रिटनच्या युजरने ट्विटरवर पोस्ट केला आहे.
हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्यात लिहिलं आहे की, ब्रिटनमध्ये आज 8 वर्षांची सोफी खूपच दुखी होती. कारण कोरोनामुळे तिचा वाढदिवस साजरा करता येणार नव्हता. त्यातच ती घरातून बाहेर पडली तेव्हा शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिला एकाच वेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भावूक झालेली सोफी रडताना दिसते.