कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे जगभरातील आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गावर अतिरिक्त भार येत आहे. १० ते १२ तास काम करत आपली जबाबदारी पार पाडावी लागत आहे. सध्या सोशल मीडियावर कोरोना योद्धाच्या हाताचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील हातांमध्ये प्रचंड सुरकुत्या आहेत. त्यावरून लक्षात येईल की आरोग्य विभागात काम करत असलेल्या लोकांना कोणकोणत्या प्रसंगांचा सामना करावा लागतो. या फ्रँटलाईन हिरोजचं सोशल मीडियावर लोक कौतुक करत आहेत.
आईएएस अधिकारी अवनीश शरण यांनी १० तासांची शिफ्ट केलेल्या डॉक्टरांच्या हाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना अववीश शरण यांना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, १० तास सतत पीपीई किट घालून काम केल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा हातातील ग्लोव्हज काढले तेव्हा हातांची अवस्था अशी झाली होती. हा फोटो पाहून कोरोनाला हरवण्यासाठी झुंज देत असलेल्या आरोग्यसेवेतील कर्मचारी वर्गाची काय स्थिती असेल हे तुमच्या लक्षात येईल.
१९ जूनला हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओला आत्तापर्यंत ४६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स ७ हजारांपेक्षा जास्त रिट्वीट्स आले आहेत. इतर कोरोना वॉरिअर्सनी सुद्धा आपापल्या हातांचा फोटो या फोटोखाली शेअर केलेला तुम्ही पाहू शकता. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढत असल्यामुळे डॉक्टरांवर अतिरिक्त भार येत आहे.
जोपर्यंत कोरोनाची माहामारी नियंत्रणात येणार नाही. तोपर्यंत या कोरोना योद्धांवर ताण येत राहण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनापासून बचावासाठी कोणतीही लस किंवा औषध सापडलेलं नाही. आरोग्यविभागातील कर्मचारी देवदुताप्रमाणे लोकांसाठी कार्य करत आहेत.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
दोस्त दोस्त ना रहा...! जिवलग मित्राची पत्नी आणि मुलाला घेऊन मित्र फरार....