मंगळुरू – देशात आणि जगात कोरोना व्हायरसचा कहर माजला आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. कोरोनावरील लस येण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच कर्नाटकातील उल्लाल शहर नगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी नगरसेवकाने अजब-गजब उपाय सुचवला आहे.
कर्नाटकच्या मंगळुरु येथील काँग्रेस नगरसेवक रविचंद्र गट्टी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ते कशाप्रकारे रम, काळी मिरची आणि अंड्यापासून कोरोनाचा बचाव करु शकतो ते सांगितलं आहे. त्यांनी व्हिडीओ काढून ही माहिती दिली आहे. या व्हायरल व्हिडीओ काँग्रेस नेते गट्टी सांगतात की, बंगळुरु आणि मेदिकरीमध्ये अनेक लोक रम पितात, मी ना रम पितो ना मासे खातो. तुम्ही फक्त एक पावडर काळी मिरचीची पूड ९० मिली रममध्ये टाका, त्याला आपल्या हाताने चांगल्यारितीने हलवून घ्या त्यानंतर ते पिऊन टाका. कोरोना पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी त्याच्यासोबत दोन अर्धे उकडलेले आम्लेट खा असं ते म्हणाले.
काँग्रेस नेते रविचंद्र गट्टी इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे सांगितले की, मी अनेक औषधे घेतली, पण घरगुती उपायच कामी आला. मी एक राजकीय नेता म्हणून नव्हे तर कोरोना समितीचा सदस्य या नात्याने तुम्हाला हा पर्याय सुचवतो आहे. रविचंद्र गट्टी यांचा १ मिनिटांचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. ज्यात ते कन्नड भाषेत बोलत आहेत. या व्हिडीओत ते रमची बॉटलही पकडून दाखवत आहेत. अनेक दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
एकीकडे लोकांमध्ये चुकीचे मेसेज पसरवत असल्याने रविचंद्र गट्टी यांच्यावर टीका होत आहे तर दुसरीकडे काही लोक काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मंगळुरु येथील आमदार यूटी खदर म्हणाले की, गट्टी यांनी अशाप्रकारे व्हिडीओ तयार करुन काय साध्य केले याचा शोध घेतला पाहिजे, मागील १५ वर्षापासून ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहेत. आम्ही या मुद्द्यावर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत आहे. पक्षातंर्गत चर्चा करुन रविचंद्र गट्टी यांच्यावर कारवाईचा निर्णय होईल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
'त्या’ बलात्काऱ्याला वैद्यकीय उपचार देऊ नका अन् त्यातूनही वाचलाच तर चौकात फाशी द्या; मनसे आक्रमक
मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हताश बापाची विनवणी; माझ्या मुलाला ताप आहे, मला कोरोना झालाय तरीही...
…तर राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवं?; देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेकडून तोंडभरुन कौतुक
लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा
कोरोनावरील आणखी एक लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात; वैज्ञानिकांना मोठं यश