कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव व्हावा. यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. समाजातील सगळ्याच घटकांना या लॉकडाऊनचा फटका बसत आहे. अनेकजण स्वतःच्या घरी नसल्यामुळे हाल होत आहेत. तर अनेकजण आपल्या गावी जाण्याासाठी वेगवेगळे मार्ग शोधताना दिसून येत आहे.
अशा परिस्थीतीत काही संधीसाधुंनी लॉकडाऊनचा चांगलाच फायदा उचलला आहे. तसंच त्याचा हा पराक्रम व्हायरल सुद्धा झाला आहे. कुन्हाडी पोलिस स्टेशन परिसरातील नांता भागात काल दुपारी काही लोक एकत्र आले आणि त्यांनी एका ट्रकवर दरोडा टाकला. लोकांनी या ट्रकमधील धान्य आणि पीठाची पोती पळवण्याचा प्रयत्न केला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसून येईल की भरपूर माणसं हे धान्य आणि पोती मिळवण्यासाठी सैरावैरा पळत आहेत. लॉकडाऊन असताना एवढी लोक रस्त्यावर कसे आले हा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडण्याची शक्यता असताना सतत अशा घटना घडत राहिल्या तर मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल. या व्हिडीओत दिसत असलेल्या लोकांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी युजर्सनी केली आहे.