लोकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वत:ला घरांमध्ये बंद करून घेतलं आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमध्ये लॉकडाउनमुळे टॉयलेट पेपरही मिळत नाहीये. दुकानांमध्येही हे मिळत नाहीयेत. अशात सॅन फ्रान्सिस्कोमधील एका तरूणाने त्याच्या मित्राला अनोखी आयडिया लावून मदत केली. त्याच्या एका मित्राच्या घरातील टॉयलेट पेपर संपला होता. त्याने थेट ड्रोनच्या माध्यमातून मित्राच्या घरी टॉयलेट पेपर पोहोचवला.
Ian Chan नावाच्या यूजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. चॅन हा ट्विटरमध्ये काम करत होता. त्याच्या घरातील टॉयलेट पेपर संपला होता. मग त्याच्या मित्राने मदतसाठी पुढाकार घेतला आणि ड्रोनच्या माध्यमातून टॉयलेट पेपर पाठवला.
मीडिया रिपोर्टनुसार, चॅनला त्याचा मित्र डेविडने सरप्राइज दिलं. डेविड हा एक स्किल्ड ड्रोन पायलट आहे. त्याने ड्रोनच्या माध्यमातून टॉयलेट पेपर पाठवून चॅनला सरप्राइज दिलं. दरम्यान, 7 एप्रिलपर्यंत सॅन फ्रान्सिको लॉकडाउन करण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत सध्या 888 पेत्रा जास्त लोकांचा जीव कोरोना व्हायरसमुळे गेलाय. 62 हजार पेक्षा जास्त लोक या व्हायरसने इथे संक्रमित झाले आहेत. मात्र, लोक अशाप्रकारे एकमेकांची मदत करत आहेत.