कोरोनाकाळात जीवघेण्या आजाराची लागण होऊ नये म्हणून काळजी घेताना दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर कोरोना पासून बचाव करण्यासाठी एका माणसाने केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मास्क, सोशल डिस्टेंसिंग, सॅनिटायजरचा वापर करून लोक स्वतःचा बचाव करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गरम पाण्याचे सेवन, वाफ घेणं या उपायांचा वापर लोक करत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वाफ घेण्यासाठी या माणसानं जुगाड केला आहे.
या माणसानं वाफ घेण्यासाठी चक्क कुकरचा जुगाड केला आहे. कुकरच्या वॉलला त्यानं एक नळी लावून त्याद्वारे वाफ घेत असल्याचं दिसत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी वाफ घेणं किती महत्त्वाचं आहे ते या माणसाच्या जुगाडातून दिसत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.याआधीही अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता जो कुकरच्या वाफेवर भाज्यांवरील घाण, व्हायरस स्वच्छ करत होता.
जुगाड करून वाफ घेणाऱ्या या तरुणाच्या व्हिडीओला २५ हजारहून अधिक लोकांनी पाहिलं असून १५० पेक्षा जास्त लोकांनी रिट्वीट केला आहे. विशेष म्हणजे या माणसानं केलेल्या जुगाडासाठी नोबेल पुरस्कार द्यावा असंही काही युझर्सनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना विनोदी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झाले आहे.
हे पण वाचा-
Video : कुत्र्याच्या पिल्लाला कासवासह खेळण्याची भारीच हौस; नेटिझन्सनी पाडला लाईक्सचा पाऊस
अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार
Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'
काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ