नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने कहर केला आहे. अनेक देश हे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र याच दरम्यान हृदयद्रावक घटना या समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर असेच काही फोटो हे जोरदार व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनमध्ये असाच एक फोटो व्हायरल झाला असून लोक भावूक झाले आहेत. एक वृद्ध महिला तिच्या पाठीवर कुत्र्याचं एक लहान पिल्लू घेऊन चालत असलेली या चित्रात दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या महिलेच्या या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने पिल्लू लवकर थकतं. माझ्यासोबतच ते असतं... याला सोडू शकत नाही. गेल्या दोन दिवसांपासून हे सुरू आहे असं म्हटलं आहे. तसेच वृद्ध महिलेच्या हातात बरंच साहित्य आहे. त्याशिवाय डोक्यावर एक गाठोडं असून त्यावर एक कुत्र्याचं लहान पिल्लू बसलं असल्याचं फोटोत दिसत आहे. कोरोनाच्या या संकटात महिला कुत्र्याची काळजी घेत असलेली पाहून सोशल मीडियावर लोकही भावनिक झाले आहेत.
आयपीएस अधिकारी विजय कुमार यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो ट्विट केला आहे. 'स्वत: अडचणीत असतानाही दया दाखवणं खूप काही शिकवतं' असं त्यांनी म्हटलं आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हेच असतं आईचं प्रेम असं एकानी म्हटलं आहे. तर सर्वांसाठी लॉकडाऊन एकसारखं नाही. हा फोटो कधीचा आणि कुठला आहे याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान
CoronaVirus News : कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहात किती वेळ जिवंत राहतो व्हायरस?; ICMR ने दिलं उत्तर
CoronaVirus News : ...म्हणून मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय जास्त सुरक्षित
बाप रे बाप! 8 दिवसांत घरातून निघाली सापाची तब्बल 123 पिल्ले; लोकांचा उडाला थरकाप
कौतुकास्पद! डॉ. हर्षवर्धन यांचा देशाला अभिमान; जागतिक आरोग्य संघटनेत मिळालं मानाचं स्थान
CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार