नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. वेगाने पसरणाऱ्या कोराना व्हायरसने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपलं लग्न पुढे ढकलण्याचा विचार केला आहे. तर काही ठिकाणी कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा संपन्न होत आहे. अशाच एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या संकटात आंध्र प्रदेश पार पडलेल्या एका अनोख्या विवाह सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लग्नासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या जेवणासाठी खास व्यवस्था करण्यात आली असून विशेष काळजी घेण्यात आली आहे. हॉलवर आलेल्या पाहुण्यांना जेवण वाढण्यासाठी वेटर्सनी पीपीई किट परिधान केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचं पालन लोकांनी केल्याचंही पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात मुदिनेपल्ली गावात 22 जुलै रोजी अनोखा लग्नसोहळा पार पडला. लग्न समारंभाच्या जेवणासाठी कॅटरर्कडे ऑर्डर देण्यात आली होती. यावेळी कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि संसर्ग टाळण्यासाठी वेटरर्सनी पीपीई सूट घालून लोकांना जेवायला वाढलं. या लग्न समारंभात साधारण 200 हून अधिक लोकांची व्यवस्था ठेवण्यात आली होती.
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी या लग्नसोहळ्यात लोकांना सोशल डिस्टंन्सिंगचं पालन ठेवून बसवण्यात आलं होतं. आंध्र प्रदेशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 हजारांवर पोहोचला आहे. तर 933 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी लग्न मंडपातच नवरीने लॅपटॉप घेऊन काम केल्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात
बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर
"हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होताहेत", मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा
शाळा ही कन्सेप्ट बाजूला ठेवून शिक्षणाचा विचार करावा लागेल, उद्धव ठाकरेंचं महत्त्वपूर्ण विधान