(image credit-writerstake)
आपण आपल्या घरी दोनवेळचं अन्न खाऊन लॉकडाऊनमध्ये सुरक्षित राहत असलो तरी जगभरात असे अनेक लोक आहेत. ज्यांना लॉकडाऊनमध्ये काय तर ऐरवी सुद्धा खायला मिळत नाही. कधी मिळालं अन्न तर पोटाची भूक भागावायची अन्यथा उपाशीच झोपायचं. अशीच अंगावर काटा आणणारी घटना केनियामध्ये घडली आहे.
जगभरात कोरोनाची महामारी आहे तर केनियामध्ये परिस्थितीपुढे हतबल असलेली एक आई आपल्या बाळाला खाऊ घालण्यासाठी काही नाही म्हणून असं काही करत आहे, की ते वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. केनियातील एका आईने भूकेने व्याकूळ झालेल्या मुलाला पाहून चुल्हीवर पाण्यात दगड उकळत ठेवले आहेत. कारण बाळाला खायला द्यायला तिच्याकडे काहीही नाही. भूक लागल्यामुळे रडत असलेल्या मुलाला झोपवण्याासाठी या आईने असं केलं आहे. ( हे पण वाचा-आली रे आली! सोशल डिस्टेंसिंगची बाईक आली, फोटो पाहताच व्हायरल झाली...)
केनियातील मोसाम्बा शहरात राहत असलेली पेनीना हिला ८ मुलं आहेत. पेनीना ही निरक्षर असून विधवा आहे. लोकांचे कपडे धुण्याचं काम करून ही महिला आपला उदरनिर्वाह चालवते. पण कोरोनाच्या महामारीमुळे तिंच संपूर्ण जीवन बदललं आहे. या कोरोनाच्या संकटामुळे या महिलेला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे की, अन्नासाठी रडत असलेल्या आपल्या लहान मुलांना झोपवण्यासाठी चुल्हा पेटवून जेवण बनवण्याचं नाटक करावं लागत आहे.
जेणेकरून जेवण मिळण्याच्या आशेने वाट पाहून मुलं झोपी जातील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोकांनी हा व्हिडीयो पाहून आईबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. ( हे पण वाचा-याला म्हणतात नशीब; एकाच दिवशी दोन लॉटऱ्या जिंकून झाला 'इतक्या' संपत्तीचा मालक)