देशातील कोरोना रुग्णांची संख्या एकूण ७७ लाखांपर्यंत पोहोचली आहे. संपूर्ण जगभरासह भारतातही कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसची लस कधी उपलब्ध होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. पण जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग, वैयक्तीक स्वच्छता या गोष्टींचा वापर करावा लागणार आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्कचा शस्त्राप्रमाणे वापर केला जात आहे. पण अजूनही काही लोक असे आहेत जे मास्कच्या वापराबाबत जागरूक नाहीत.
तुम्हालाही मास्क वापरायला कंटाळा येत असेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. तुमचे अनेक गैरसमज हा व्हिडीओ पाहून दूर होतील. ट्विटर युजर डॉक्टर अरविंद सिंग सोइन यांनी हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ८ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलं आहे.
डॉक्टर अरविंद या आपल्या पुढच्या ट्विटमध्ये माहिती देताना सांगितले की, हे एक व्हिज्यूअल आर्ट आहे. इडिटिंग करून एक महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र व्हायरसला पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची आवश्यकता असते. डॉक्टर अरविंद यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला लोकांनी खूप पसंती दिली आहे. कोरोनाकाळात जे लोक मास्क वापरण्याबात टाळाटाळ करतात त्यांच्यासाठी हा व्हिडीओ डोळे उघडणारा ठरेल.
सोशल मीडियावर मास्कच्या वापराबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीयोमध्ये तुम्हाला दिसून येईल की, हा एका महिलेनं मास्क लावला नाही म्हणून विमानातील कर्मचारी या महिलेला बाहेर काढत आहेत, बाहेर काढलं म्हणून ही बाई रागाने अपशब्द वापरते. व्हिडीओ पाहताना तुम्हाला दिसून येईल ही बाई मुद्दाम इतरांच्या अंगावर खोकते आणि थुंकण्याचा प्रयत्न करते. या महिलेचे असभ्य वर्तन पाहून विमानातील इतर प्रवाश्यांनाही या महिलेची किळस येत असावी. Video : बापरे! मासे पकडण्यासाठी नदीत टाकलं जाळं, गळाला लागली मगर, अन् मग.....
खोकता खोकता ही बाई सगळे मरायला हवेत असंही म्हणते. ही घटना उत्तर आयलँडची राजधानी बेलफास्टची आहे. सदर महिला ही बेलफास्ट आंतराराष्ट्रीय विमानतळावरून एडीनबर्ग येथे जात असलेल्या विमानात बसली. कर्मचाऱ्यांनी मास्क लावण्याची विनंती केल्यास या महिलेने मास्क लावण्यास नकार दिला आणि रागात मोठ्याने ओरडू लागली. या बाईचं विचित्र बोलणं अनेक प्रवाश्यांनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतलं आहे. Video: बाबो! ही असली कसली हौस,‘या’ साडीच्या दुकानातल्या गर्दीने कोरोनाच जाईल पळून