जवळपास सगळं जग हे कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. अनेकांचा जीव कोरोनामुळे गेला असून कोरोनाचं हे थैमान थांबायचं नाव घेत नाहीये. लोकांना सतत घरात थांबण्याचं आवाहन केलं जात आहे. पण तरी सुद्धा काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशांना घरात पाठवण्यासाठी दोघांना चक्क 'भूत' व्हावं लागलं आहे.
इंडोनेशियातील ही घटना आहे. लॉकडाऊनचं सक्तीने पालन व्हावं म्हणून दोन भूत रस्त्यावर येऊन बसले आहेत. Kepuh हे इंडोनेशियातील एक गाव आहे. येथील दोन वॉलेंटियर्सने ही आयडिया लावली आहे. त्याने भूताचे कपडे घातला आणि मेकअप करून रस्त्यावर बसले.
गावाच्या सरपंचानी सांगितले की, त्यांनी ही आयडिया लोकांना जागरूक करण्यासाठी वापरली आहे. हे थोडं गमतीदार आहे, पण भीतीदायकही आहे. या दोन्ही मुलांचं नाव Deri Setyawan आणि Septian Febriyanto आहे. दोघेही रात्री पांढरे कपडे घालून बेंचवर बसतात. याची माहिती पोलिसांना सुद्धा देण्यात आली आहे.
ही एक पारंपारिक पद्धत आहे. याला Pocong असं म्हटलं जातं. यात जो भूत असतो तो चादरीत गुंडाळलेला असतो. आतापर्यंत इंडोनेशियात 4241 कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत आणि 373 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.