सध्या सोशल मीडियावर कोरोनाशी संबंधीत अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आज असा एक व्हायरल फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या फोटोत एक घोडा आहे. आणि या घोड्यावर चक्क कोरोना व्हायरसारखी दिसत असलेली प्रिंट करण्यात आली आहे.
एका पोलीस अधिकारी असलेल्या व्यक्तींने घोड्यावर अशा पध्दतीने प्रिंट करून घेतलं आहे. हे दृश्य आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील आहे. मारुती शंकर नावाच्या पोलीसाने लोकांमध्ये कोरोना विषयक जनजागृती करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.
हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोला एक हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. काही लोकांनी या फोटोचं कौतुक केलं आहे. तर काहींना ही कल्पना आवडलेली नाही. घोड्याच्या शरीरावर असं कोरोनाचे चित्र प्रिंट करायला नको होते. असं काहीजणांचं मत आहे.