कोरोना व्हायरस जगभरासह भारतात सुद्धा झपाट्याने पसरत आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांना कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवता यावं यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनचं पालन लोक अजूनही करत नाहित. सोशल डिस्टेंसिंग सगळयाच ठिकाणी काटेकोरपणे पाळलं जाण्यासाठी प्रशासन कठोर पाऊलं उचलत आहेत.
इ
मारतींच्या गच्चीवर लोकांनी एकत्रित येऊ नये. यासाठी ड्रोन कॅमेरा पोलिसांद्वारे सोडण्यात येत आहे याद्वारे लोकांना गर्दी करण्यापासून रोखता येईल अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुरतमधील सरथाणा चेकपोस्ट जवळील एका इमारतीत लोकं गच्चीवर भजी तळताना दिसत आहेत. लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही हा प्रकार इथे चाल्लाय.
याचवेळी सुरत पोलिसांच्या ड्रोनमध्ये हे चित्र कैद झाले. दरम्यान गच्चीवर भजी तळणाऱ्या लोकांनी पोलिसांचा ड्रोन पाहताच तेथून पळ काढला आहे. लॉकडाऊनमध्ये नियम कठोर असतानाही लोक मात्र मनमानी करताना दिसत आहेत. त्यामुळं कलम 144च्या उल्लंघन करणाऱ्यांवर सध्या कारवाई केली जात आहे.