WHO ने कोरोनाबाबत अनेक प्रकारच्या सूचना जारी केल्या आहेत. जगभरात #Safehandschallenge सुरू आहे. लोकांनी हात कसे धुवावे याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. केरळच्या पोलिसांनी देखील हात धुण्याची पद्धत सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. पण आता एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात तुम्हाला हे कळेल की, तुम्ही हात योग्यप्रकारे धुवत आहात की नाही. कारण अनेकदा हात धुतांना काही चुका केल्या जातात.
हरजिंदर सिंह कुकरेजा नावाच्या यूजरच्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यांनी लिहिले की,'इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत'.
हा व्हिडीओ सोशल मीडियात वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून आतापर्यंत 17 लाख लोकांनी पाहिलाय हा व्हिडीओ. यात एक व्यक्ती हातत ग्लव्स घालून हात धुण्याची योग्य पद्धत सांगत आहे. यात हे दिसतं की, कशाप्रकारे हात धुतांना काही भाग व्यवस्थित स्वच्छ केला जात नाही.