कोरोना व्हायरसच्या थैमानातून बचावासाठी कितीतरी उपाय निकामी ठरले आहेत. अशात कोरोनाच्या रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना असं वाटत आहे की, आता आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागेल. दरम्यान अशात एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जपानमधील एक रेस्टॉरन्टचा व्हिडीओ आहे. यात एक प्रयोग केला गेलाय. यात तुम्हाला कळेल की, व्हायरसला नष्ट न करता लॉकडाऊन संपवलं तर हा व्हायरस कशाप्रकारे पसरेल.
या व्हिडीओत एका व्यक्तीने हातावर एक द्रव्य पदार्थ लावला. काही वेळासाठी या पदार्थाला तुम्हाला कोरोना व्हायरस समजा. नंतर ही व्यक्ती मित्रांसोबत रेस्टॉरन्टमध्ये जेवण करते. मित्रांसोबत गप्पा करतो. तोपर्यंत त्या द्रव्य पदार्थांच इन्फेक्शन दूरपर्यंत पोहोचतं. सगळीकडे तो पदार्थ दिसू लागतो. म्हणजे व्हायरस किती वेगाने आणि कसा पसरतो हे यात दाखवलं आहे.
म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की, लॉकडाऊन संपवून सामान्य जीवन जगता येईल तर आता ते विसरा. कारण कोरोना इतक्या सहज तरी नष्ट होताना दिसत नाहीये.