कोरोना महामारीच्या या संकटकाळात देश घाबरलेला आहे. एकीकडे मृतांची संख्ये दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे या महामारीत माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनाही समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना सोशल मीडियावरून समोर आली आहे. एका सोशल मीडिया पोस्टनुसार एका तरूणीला तिच्या वडिलांसाठी ऑक्सीजन सिलेंडरची गरज होती. तर यासाठी तिला तिच्या शेजाऱ्याने त्याच्यासोबत शऱीरसंबंध ठेवण्याची मागणी केली.
सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही घटना समोर आली आहे. भावरीन कंधारी नावाच्या एक ट्विटर यूजरने हे ट्विट केलं आहे. तिने लिहिलं आहे की, 'माझ्या मित्राच्या बहिणीला तिच्या वडिलांसाठी ऑक्सीजन सिलेंडरची गरज होती. तिच्या शेजाऱ्याने सिलेंडरच्या बदल्यात तिला आपल्यासोबत झोपण्याची मागणी केली. काय यावर कारवाई केली जाऊ शकते? तो तर हेच सांगेल की मी असं बोललो नाही'.
आजतकसोबत बोलताना भावरीन कंधारीने या घटनेला दुजोरा दिला आहे. जसं हे ट्विट व्हायरल झालं लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले. कुणी म्हणाले की, त्या व्यक्तीचं नाव सार्वजनिक करावं जेणेकरून त्याला लाज वाटेल. तर कुणी म्हणाले की, त्या व्यक्तीवर पोलिसात तक्रार दाखल करावी.
इतकंच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा घटना सतत समोर येत आहेत. याच्याशी मिळती जुळती आणखी एक घटना समोर आली आहे. एका दुसऱ्या तरूणीने ट्विट करत सांगितलं की, तिने कोरोना उपचारासंबंधी माहिती घेण्यासाठी एका नंबरवर कॉल केला होता. त्यावेळी तिकडून उत्तर आंलं की, 'अहो मॅडम, मी तर केवळ मुली सप्लाय करतो. अजून काही नाही'. यानंतर कॉल डिस्कनेक्ट केला.
या केसमध्ये तरूणीने हरयाणा पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि तिने पोलिसांना हेही सांगितलं की, कॉल केल्यावर उत्तर काय आलं होतं. यानंतर पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली आणि चौकशी सुरू केली आहे.