मुंबई – चीनच्या वुहान शहरापासून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील साडेसात लाखांहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. ३४ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर पसरलं आहे. वाऱ्याच्या वेगाने पसरणाऱ्या कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालं नाही. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहे. चीनपेक्षाही कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या अमेरिकेत जास्त आहे.
कोरोनाचा सामना जगातील १८५ देश करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी घोषित केली आहे. कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाऊन केले आहे. कोरोनाचं संकट कधी संपणार याची कोणालाच कल्पना नाही. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये २२ ऑगस्ट २०१९ रोजी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जगातील सर्वात लहान १४ वर्षीय ज्योतिषाने अंदाज वर्तवला होता. तो खरा ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. त्याचं नाव अभिग्य आनंद असं आहे.
नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२० हा काळ जगासाठी अत्यंत कठीण असणार आहे. कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण १७ नोव्हेंबर २०१९ लाच सापडला होता. या सहा महिन्याच्या काळात जागतिक रोगाचा प्रार्दुभाव वाढेल आणि यामुळे संपर्ण जगात चिंतेचे वातावरण असेल. ३१ मार्चपर्यंत जगासाठी हे संकट सर्वात मोठं असेल. परंतु २९ मे रोजी पृथ्वी या कठीण काळापासून दूर होईल. जागतिक रोगाचा प्रार्दुभाव कमी होईल. सर्वकाही सुरळीत होईल असं या ज्योतिषाने सांगितले आहे.
अभिग्य आनंदची २०१३ मध्ये इंडियन टाइम्सने मुलाखत घेतली त्यात त्याच्या ज्योतिष कौशल्याची चाचणी घेण्यात आली. त्याच्या ज्ञानाने अनेकांना आश्चर्यचकीत केले होते. ज्योतिषशास्त्राद्वारे त्याने सोन्या-चांदीच्या किंमती आणि अन्य भारतीय कार्याबद्दल ज्योतिष अंदाज वर्तवला होता तो खरा ठरला.
कोरोना व्हायरसबाबत सांगाल तर एखाद्या विषाणूसोबत हे जागतिक युद्ध आहे. न दिसणारा शत्रूशी माणूस मुकाबला करत आहे. ज्योतिषाच्या आधारे ३१ मार्चपासून कोरोनाचा क्लायमॅक्स सुरु होईल. कारण मंगळ, शनी आणि चंद्र आणि राहूदेखील एकत्रित होतील असे त्यामुळे यात बदल होण्यास सुरुवात होईल. ही एक दुर्मिळ घटना आहे. ज्योतिषशास्ज्ञानुसार मंगळ, शनी आणि बृहस्पृती हे सर्व सौरमंडळातील सर्वात शक्तिशाली ग्रह मानले जातात. जेव्हा ते सर्व एकत्र असतात तेव्हा त्यांची पृथ्वीवरील शक्ती प्रचंड असते. चंद्राला पाण्याचा प्रसार करणारा ग्रह आणि राहूला संचार ग्रह मानला जातं त्यामुळे खोकला आणि शिंका यामुळे संक्रमण वाढतं. अशा परिस्थितीत सोशल डिस्टेंसिग ठेवणं गरजेचे असते.
२९ मेपर्यंत ज्योतिषशास्त्रानुसार या घातक योगातून पृथ्वी बाहेर पडेल. तेव्हापासून आजार कमी होण्यास मदत मिळेल त्याचसोबत आर्थिक मंदी नोव्हेंबर २०२१ पर्यंत संपेल असा अंदाज अभिग्य आनंदने व्यक्त केला आहे.