उत्तर कॅरोलिना-
जर एखादे जोडपे स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनला योग्य वेळी पोहोचले नाही. तुम्हाला ऐकून विचित्र वाटेल पण ही घटना घडली आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका नवविवाहित जोडप्यासोबत ही घटना घडली आणि ते स्वतःच्या रिसेप्शनला वेळेवर पोहोचू शकले नाहीत. सुमारे दोन तास हे दाम्पत्य लिफ्टमध्ये अडकलं होतं. नंतर अग्निशमन दलाचे जवान आल्यावर त्यांना लिफ्टमधून बाहेर काढण्यात आलं. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
पनव आणि व्हिक्टोरिया झा उत्तर कॅरोलिनातील ग्रँड बोहेमिया हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी तयार होत होते. हॉटेलच्या १६व्या मजल्यावर त्यांचे रिसेप्शन होते. मात्र काही वेळाने ते लिफ्टमध्ये अडकल्याचं लक्षात आलं. व्हिक्टोरियाची बहीण आणि रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले तीन पाहुणेही लिफ्टमध्ये अडकले होते. दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना सुखरुप बाहेर काढता आलं. या सर्वांची शार्लोट अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुटका केली. पण हे लोक पोहोचेपर्यंत पार्टी संपली होती.
सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. ज्या लिफ्टनं हे दोघं जात होते ती लिफ्ट पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्यामध्ये अडकली होती. या संपूर्ण घटनेची माहिती पानव यांनी दिली. जेव्हा लिफ्ट थांबली तेव्हा काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं होतं. पण इतका वेळ लागेल असं वाटलं नव्हतं. तासाभरानं दरवाजा अर्धा उघडला. पण लिफ्ट बंद पडल्यानं काहीच करता येत नव्हतं, असं नवरदेवानं सागितलं.
वऱ्हाडी मंडळीही अडकलीदरवाजा उघडला तेव्हा समोर आणि मागे फक्त काँक्रीटची भिंत दिसत होती. जे काही घडत आहे ते सामान्य नाही हे पनव आणि व्हिक्टोरियाला समजलं होतं. जीव वाचवल्याबद्दल व्हिक्टोरियाने अग्निशमन दलाचं आभार मानले आहेत. व्हिक्टोरियाच्या म्हणण्यानुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन बचावकार्य सुरू केल्यावर दिलासा मिळाला. अग्निशमन दलाने त्यांना चौथ्या मजल्यावरून सुखरुपपणे बाहेर काढलं.