नवी दिल्ली - देशात सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढलं आहे. कोर्टासमोर अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातीलच एक खटला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नाच्या १५ वर्षांनी पत्नीने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी ४० लाखांच्या पोटगीची मागणी केली आहे. पत्नीच्या या मागणीवरून कोर्टाच्या न्यायाधीशांनी चांगलेच सुनावले. लग्नानंतर पती आणि पत्नी एक महिना सोबत राहतात, मग काही कारणांवरून दोघांचे नाते तुटते. त्यानंतर काही पत्नी पतीवर खटले दाखल करते.
पोटगीच्या नावाखाली आधी १५ लाख, मग २० लाख, पुढे ३० लाखापर्यंत मागणी करते परंतु खटला १५ वर्ष पूर्ण होईपर्यंत पोटगीची रक्कम ४० लाखांपर्यंत पोहचते. जेव्हा कोर्टासमोर हे प्रकरण येते तेव्हा कोर्ट दोन्ही बाजूच्या पक्षकारांना बोलवतं. महिलेचा वकील हजर असतो परंतु ती येत नाही. पतीची बाजू मांडणारा वकील व्यक्तीला कोर्टासमोर हजर करतो. जेव्हा न्यायाधीश प्रकरणाची सुनावणी करतात तेव्हा पतीला विचारतात, तुम्हाला मुलं आहेत का त्यावर तो नाही असं उत्तर देतो. कोर्ट यावर सामंजस्याने तोडगा काढण्यास सांगतं. मात्र इतक्या कमी कालावधीसाठी सोबत राहिल्यानंतर १५ वर्षांनी ४० लाखांची मागणी ऐकून दोन्ही न्यायाधीश हैराण होतात. कायद्याचा वापर जबरदस्तीनं वसुलीसाठी होऊ शकत नाही असं महिलेच्या वकिलांना सुनावतात. तेव्हा पतीने ३० लाखांच्या पोटगीसाठी तयार आहे असं सांगते त्यानंतर कोर्ट त्यांना संमती देते.
कोर्टाने पतीला ३०-३१ लाखांत साम्यजंस्याने तोडगा काढा नाहीतर आम्ही Irretrievable Breakdown of Marriage असा रिपोर्ट देऊ. जवळपास साडे सात मिनिटांच्या या कारवाईचा व्हिडिओ दिपीका भारद्वाज नावाच्या महिलेने ट्विट केला आहे. त्यावर लिहिलंय की, लग्न १ महिना टिकलं, १५ वर्षापासून वेगळे राहतात. कुणीही मुल बाळ नाही. पत्नीने पतीविरोधात अनेक खटले दाखल केलेत. पोटगी ४० लाखांची मागितली आहे. पती ३० लाख देण्यास तयार आहे असं तिने म्हटलं आहे.
या ट्विटवर एका युजरने म्हटलं की, ४० लाख खंडणीसाठी कायद्याचा वापर केला जाऊ शकत नाही, न्यायाधीश त्यावर बोलू शकतात. पत्नी पतीसोबत एक आठवडा राहू, एक महिना राहू अन्यथा १५ वर्षानंतरही ३०-३१ लाख वसूल करते असं त्याने सांगितले. त्याशिवाय आता तर लग्नापासून भीती वाटते. मी एक करार करून लग्न करेन असं दुसऱ्या युजरने सांगितले.