जर तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्हाला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अनेकदा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो. पण तुम्ही जोपर्यंत हार मानत नाही. तोपर्यंत जिंकण्याची संधी तुमच्याकडे असते. सध्या सोशल मीडियावर केरळचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांची हिंमत वाढली आहे. एका महिलेला परिक्षेदरम्यान कोरोना संक्रमणाचा सामना सामना करावा लागला होता. अशा स्थितीतही या महिलेनं हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले आणि शेवटी रुग्णवाहिकेत बसून ही परिक्षा दिली.
पीपीई किट घालून पेपर दिला
या फोटोतील महिलेनं पीपीई घालून PSC staff nursing ची परिक्षा दिली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही महिला शांतपणे रुग्णवाहिकेत बसून पेपर सोडवत आहे. लोकांनी या महिलेचं खूप कौतुक केलं आहे. मथूरभूमीनं दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव शालिनी आहे. कोरोना झाल्यानंतर या महिलेला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. राकेश पाई या शाळेच्या मुख्याध्यापकांनी या परिक्षेसाठी संपूर्ण व्यवस्था केली होती. बोंबला! 'नकली बेबी बंप' लावून प्रियकराच्या घरी पोहोचली तरूणी आणि पुढे जे झालं....
पीआर हरीकुमार रुग्णवाहिकेच्या चालकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीपीई किट घालून शालिनीला प्रश्नपत्रिका देण्यात आली. सोशल डिस्टेंसिंगसह त्यांनी कोणाच्याही संपर्कात येणार नाही याची काळजी घेतली होती. सोशल मीडिया युजर्स शालिनीला ऑल द बेस्ट म्हणाले आहेत. वाह! वयस्कर जोडप्यानं धरला असा ठेका; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात.....
याआधीही अशीच घटना समोर आली होती. त्यावेळी एक महिला बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचचं परिक्षेला बसली होती. परिक्षेला बसल्या बसल्या तिला प्रसृती कळा सुरू झाल्या होत्या. परिक्षाकेंद्रावरील लोकांनी या महिलेच्या पतीला संपर्क करून रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर या महिलेनं बाळाला जन्म दिला आणि काहीवेळानं आपला पेपर पूर्ण सोडवला.