भारतातील लोक जगातील कानाकोपऱ्यात वसलेले आहेत. त्यांना भारतातील अनेक वस्तूंची नेहमीच गरज पडते. त्यातीलच एक म्हणजे शेणाच्या गवऱ्या. अमेरिकेच्या न्यू जर्सीतील एका स्टोरमधे गायीचं शेण गवऱ्यांच्या स्वरूपात मिळत आहे. इथे शेण प्रॉपर पॅकेजिंग करून विकलं जातं तेही २.९९ डॉलर म्हणजेच २१५ रूपयांना.
@samar11 नावाच्या एका ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला आहे. त्यांने लिहिले की, हा फोटो त्याच्या चुलत भावाने एडिसनच्या एका स्टोरमधून पाठवला आहे. पण माझा प्रश्न हा आहे की, हे शेण देशी गायीचं आहे की, यॅंकी गायीचं?
येथील सब्जी-मंडी नावाच्या सुपरमार्केटमधे हे शेण विकलं जातं. यावर लिहिलंय हे शेण भारतातील आहे. हे ट्विट पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण भारतात तर आता शेण कुणी उचलतही नाही आणि भारताबाहेर इतकं महाग विकलं जातं.