भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे येथे गाईचं फार महत्त्व आहे. हिंदू धर्मात गायीचं महत्त्व असल्याचे काही आध्यात्मिक, धार्मिक आणि चिकित्सीय कारणंही आहेत. गाईला दैवतप्रमाणे समजले जाते. सध्या सोशल मीडियावर गाईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मनाला स्पर्श करणारा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक गाय कुत्र्याच्या पिल्लांना दूध पाजत आहे. सोशल मीडियावर लोकांना या व्हिडीओला तुफान पसंती दिली आहे.
हा व्हिडीओ इंडीयन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की, गाय झोपलेल्या अवस्थेत असून चार कुत्र्याच्या पिल्लांना दूध पाजत आहे. माता स्वर्गदूत आहे. जी आई आपल्या मुलांमध्ये कधीत भेदभाव करत नाही. असं सुशांत नंदा यांनी लिहिले आहे. सुशांत यांनी २३ जुलैला हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला आतापर्यंत १ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि १२० पेक्षा जास्त रिट्वीट्स आणि कमेंट्स आल्या आहेत. लोकांनी सोशल मीडियावर या व्हिडीओला तुफान पसंती दिली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खारूताईचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. यात तहानलेली खारूताई पाण्यासाठी ज्या प्रकारे त्या व्यक्तीला विनंती करत आहे, ते पाहून कुणीही सहज भावुक होईल. या व्हिडीओत हातात पाण्याची बॉटल घेऊन एक व्यक्ती दिसत आहे. ही खारूताई त्या व्यक्तीच्या पायानजीक येऊन दोन्ही हात पसरवून पाणी मागताना दिसत आहे. हा व्हिडीओ कधीचा व कुठला आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.
एक मुलगी आणि मुलगा त्या खारूताईकडे पाहत होते. माणसाच्या हातात त्या खारूताईला पाण्याची बाटली दिसली आणि त्यानंतर दोन्ही पायांवर उभी राहून तिनं त्याच्याकडे पाणी मागीतली. त्या व्यक्तीनंही त्या खारूताईला पाणी दिलं. भारताचे वन अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आतापर्यंत ४.२ लाखवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.
आता बोला! बाइक रेस बघण्यासाठी चक्क क्रेन घेऊन आले लोक, सोशल डिस्टंसिंगची अनोखी आयडियाची कल्पना!
बोंबला! सूपमध्ये त्यांना असं काही दिसलं की परिवारातील सर्वांना करावी लागली कोरोना टेस्ट!