सोशल मीडियावर प्राण्यांच्या इमानदारीचे दर्शन घडवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका गाईचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ओडिशाच्या (Odisha) मलकनगिरी (Malkangiri) शहरातील एका गायीचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. वासराला घेऊन जात असताना त्याची आई म्हणजेच ती गाय हातगाडीच्या मागे धावताना दिसत आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ काढला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता जखमी वासराला दवाखान्यात नेण्यासाठी एका हातगाडीवर ठेवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना गाईबाबत खूप वाईट वाटत आहे. कारण आपल्या जखमी वासराला घेऊन जाताना एका हातगाडीच्या मागे ही गाय धावत आहे. गाईचा जीव आपल्या वासरासाठी कासावीस होत आहे. दोन व्यक्ती हातगाडीवरून या वासराला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, या वासाराची आईदेखील त्यांच्या मागे धावताना दिसत आहे.
काय सांगता राव! पठ्ठ्यानं लग्नाच्या पत्रिकेसह घरोघरी पाठवली दारूची बाटली अन्...; पाहा फोटो
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वेगवान वाहनाच्या मध्ये आल्याने वासरु जखमी झाले आहेत. त्यानंतर लोकांनी याबाबत जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात माहिती दिली. तसेच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यु-ट्यूबवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर
गाईला मारायला गेला, अन् चांगलाच तोंडावर पडला
गाईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका गाईला हा माणूस होता. इतकंच नाही तर माणूस गाईला मारल्यानंतर तीची शेपटीसुद्धा पिळतो. ही शेपटी पिळल्यानंतर गाईला प्रचंड वेदना सुद्धा होतात. तसंच राग सुद्धा येतो.
गाईची शेपटी पिळल्यानंतर तीला प्रचंड राग येतो. आपली सहनशक्ती संपल्यानंतर ही गाय या माणसाला चांगलीच अद्दल घडवते. Praveen Angusamy या आयएफएस अधिकाऱ्याने या व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सुरूवातीला हा माणूस गाईला लाथ मारतो आणि शेपटी पिळतो. गाईचा राग अनावर झाल्यानंतर ती त्याला शिंगसुद्धा मारते. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा भीतीने थरकाप उडाला आहे. कारण गाय जेव्हा त्या माणसाच्या अंगावर धावून जाते. त्यावेळी त्या माणसाचं काय झालं असेल याचा विचारही केला जाऊ शकत नाही.