Crab stuck in woman's ear : काही लोकांना अॅडव्हेंचरची फारच आवड असते. लोक आपल्या इच्छा, आवडी पूर्ण करण्यासाठी रिव्हर राफ्टिंग, कधी बंजी जम्पिंग, तर कधी स्कूबा डायव्हिंग करतात. पण कधी कधी लोकांना आपल्या आवडी पूर्ण करणं महागात पडतं. असंच काहीसं एका महिलेसोबत समुद्रात स्नॉर्किलिं करताना झालं. रिपोर्ट्सनुसार, महिला प्यूर्तो रिकोच्या सॅन जुआनमध्ये स्नाॉर्किलिंगचा आनंद घेत होती. तेव्हाच तिच्या कानात खेकड्याचं पिल्लू गेलं. यानंतर ती वेदनेने ओरडत होती. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ मनात धडकी भरवणारा आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कानाच्या आत खेकडा फसलेला आहे. हा व्हिडीओ टिकटॉकवर @wesdaisy नावाच्या टिकटॉक हॅंडलरर शेअर केला आहे. ज्यावर एका यूजरने कॅप्शन लिहिलं आहे की, प्यूर्तो रिकोच्या सॅन जुआनमध्ये महिलेच्या कानात छोटा खेकडा गेला.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिलेच्या कानात खेकडा बाहेर काढण्यासाठी एक व्यक्ती तिची मदत करत आहे. तो चिमट्याच्या मदतीने तिच्या कानातील खेकड्याचं पिल्लू काढण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर महिलेच्या कानातील खेकडा बाहेर निघतो. जसा खेकडा बाहेर निघतो महिला जोरात ओऱडते.