सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच वेगवेगळ्या प्राण्याचे आणि पक्ष्यांचे (Animal Video) व्हिडीओज व्हायरल होत असतात. कधी कधी प्राण्याचे हेच व्हिडीओ पाहून हसू अनावर होते, तर कधी माणसं खूप इमोशनल होतात. सोशल मीडियावर एका खेकड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या व्हिडीओमध्ये खेकडा सफरचंद खाताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेचजण अवाक् झाले आहेत.
बर्याच वेळा लहान मुलांचे भोजन (खाण्याच्या सवयी) पाहून त्यांचे पालक देखील म्हणतात - तुझ्यापेक्षा प्राणी चांगले खात असतील. हीच गोष्ट अगदी सत्य असल्याचे सिद्ध होते. काही प्राणी चांगले खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. अलीकडेच नेचर अँड अॅनिमलज नावाच्या ट्विटर अकाऊंटवर एक क्रॅब व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, खेकडा अतिशय काळजीपूर्वक सफरचंद खाताना दिसत आहे. आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला
खेकड्याचा हा व्हिडीओ १५ सेंकदाचा असून आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर ७ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. ३ हजारापेक्षा जास्त युजर्सनी हा व्हिडीओ रिट्विटही केला आहे. खूप मॅनर्स ठेवून खेकडा संफरचंद खाताना या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ ज्यांनी कोणी पाहिला ते सगळेचजण अवाक् झाले आहेत. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं