जंगलात शिकारी प्राण्यांची (Wild Animals) अजिबातही कमी नाही. जंगलात सिंह, वाघ, बिबट्या या प्राण्यांच्या तावडीत सापडल्यास कोणाचंही वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. विशेषतः हरण तर अतिशय कोमल प्राण्यांच्या श्रेणीत येतं आणि जंगलात सर्वाधिक शिकार याच प्राण्याची होते. दुसरीकडे मगरीबद्दल बोलायचं झालं तर ज्याप्रकारे सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, तसंच मगरीला पाण्याचा राजा म्हटलं जातं. पाण्याच्या आत मगर मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करते.
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक निरनिराळे व्हिडिओ (Animal Viral Videos) सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक हरणाचं पिल्लू आधी मगरीची आणि नंतर बिबट्याची शिकार बनल्याचं पाहायला मिळतं (Leopard and Crocodile Attack on Deer).
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक विशालकाय मगर कशाप्रकारे पाण्याच्या बाहेर असलेल्या हरणाच्या पडसाला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करते आणि त्याला पाण्यात घेऊन जाते. मात्र, सुदैवाने हे हरण मगरीच्या तावडीतून सुटतं. परंतु बाहेर आणखी एक मोठं संकट उभा आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती. पाण्यात बाहेर निघताच या पिल्लावर एक बिबट्या हल्ला करतो. हा बिबट्या आधीपासून झाडीच्या मागून हरणावर लक्ष ठेवून असतो. हे दृश्य पाहून तुम्हालाही 'आगीतून उठून फुफाट्यात पडणं' ही म्हण आठवेल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा हैराण करणारा व्हिडिओ wildmaofficial नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, ३ हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.