सिंह जंगलाचा तर मगर पाण्यातील राजा असल्याचं म्हटलं जातं. एखादा प्राणी पाण्यात उतरताच मगर त्याची शिकार करते. अगदी सिंहापासून ते इतर मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत सगळेच मगरीपासून दूर राहाण्यातच भलं समजतात. सोशल मीडियावर अनेकदा मगरीचे निरनिराळे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्याही चांगलेच पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडिओ (Crocodile Attack Video) समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये एका मगरीने थेट आपल्या केअर टेकरवरच हल्ला केल्याचं पाहायला मिळतं (Crocodile Attacks on a Woman). काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मगर आपल्या शिकारीला जबड्यात पकडून काही क्षणातच समोरच्याचा जीव घेते. यानंतर ती पाण्यातच शिकारीचे तुकडे करून खाते. अशात मगरीने एखाद्या माणसावर हल्ला केल्यास त्याचं वाचणंही जवळपास अशक्य होऊन जातं.
सध्या समोर आलेला व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की एक केअर टेकर मगरीला खाद्य देण्यासाठी पुढे जाते. मगरीला खाद्य देण्यासाठी ती आपला हात पुढे करते. मात्र मगर अचानक केअर टेकरवर हल्ला करते आणि तिचा हात आपल्या जबड्यात पकडते. यानंतर मगर या तरुणीला पाण्यात खेचते. मगर तिला पाण्यात घेऊन जात तिथेही तिच्यावर हल्ला करते. ही तरुणी स्वतःला मगरीच्या तावडीतून सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न करते.
इतक्यात तिथे उपस्थित असलेले इतर कर्मचारीही धावत या तरुणीच्या मदतीसाठी पुढे येतात. हे लोक मगरीला पकडून तिचा जबडा खोलतात. अखेर ही तरुणी आपला जखमी झालेला हात मगरीच्या जबड्यातून बाहेर काढते आणि स्वतःची सुटका करून घेते. हा व्हिडिओ अतिशय भीतीदायक आणि अंगावर काटा आणणारा आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी या तरुणीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.